Slide 1
World Class Healthcare

News Archives

Pflow in Shark Tank India, Season 2

आपल्या कार्यकतृत्वाने नेहमीच सर्वांना अवाक् करणारे खानदेशचे सुपूत्र तथा देशातील प्रतिथयश युरोलॉजिस्ट डॉ. आशिष पाटील यांनी सोनी टीव्हीवरील शार्क टँक इंडिया या कार्यक्रमातून 60 लाख रुपयांची गुंतवणूक मिळवून पुन्हा एकदा थक्क केले आहे.

डॉ. पाटील आपल्या संशोधित केलेल्या पी-फ्लो या उपकरणांसह शार्क टँकमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांच्या पत्नी डॉ. प्रीती पाटील यांनी डॉ. पाटील यांच्या खांद्याला खांदा लावत दमदार असे सादरीकरणे केले. 1 टक्का भागीदारी आणि 60 रुपयांची ऑफर डॉ. पाटील दाम्प्त्यांनी शार्क्सना दिली. त्यापैकी शार्क नमिता थापर आणि अमित जैन यांनी संयुक्तपणे 60 लाखांची गुंतवणूक केली. आपल्या प्रश्नांनी भल्या- भल्यांना थरकापण आणणारे शार्क मात्र डॉ. पाटील दाम्प्त्याच्या पी-फ्लोची माहिती काळजीपूर्वक ऐकत होते. शार्कनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. आशिष आणि डॉ. प्रीती पाटील अगदी शांतपणे तसेच अभ्यासपूर्ण उत्तर देत होते हे विशेष. यामुळे पी-फ्लोच्या पीचला सुपर्ब पिच म्हणूनही संबोधले गेले.

आज सू-सू ला गेलात का?
डॉ. प्रीती यांनी शार्क पीयूष बंसल यांना कार्यक्रमाच्या सुरवातीलाच थेट प्रश्न विचाराला आज तुम्ही किती वेळा सू-सूला गेलात, तुमची धार कशी होती, स्ट्राँग होती की, विक होती अचानक असे प्रश्न विचाल्याने सर्वच शार्क एकमेकांकडे पाहायला लागले. तेव्हा डॉ. प्रीती म्हणाल्या तुम्हाला विचित्र वाटले ना? असेच प्रश्न आम्ही रुग्णांना विचारतो. अशा प्रश्नांची उत्तरे देताना विचार करा त्यांना कसे वाटत असेल. युरिन इन्फेक्शन, प्रोस्टेट, स्ट्रीक्चर, लघवी अडकणे, पुरुष- महिला वंध्यत्व आदी रोगांमध्ये डॉक्टर युरोफ्लोमेट्री टेस्ट करायला सांगतात. युरोफ्लोमेट्री टेस्टसाठी रुग्णांना महिन्यांतून दोन ते तीन वेळा हॉस्पिटलमध्ये जावे लागते. तेथे टेक्निशियन त्यांना एका इलेक्ट्रॉनिक पॉटमध्ये लघवी करायला सांगतो आणि लघवी धार सुरू झाली की, तो कॉम्प्युटर वर क्लिक करतो. अशा प्रकारे टेस्टला सुरवात होते आणि नंतर रिपोर्ट येतो. यात रुग्णांचा वेळ, श्रम आणि पैसा खर्ची पडतो. एका वेळच्या टेस्टसाठी हजार ते अकराशे रुपये मोजावे लागते. या प्रकाराच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी पी-फ्लोचा आविष्कार करण्यात आला असून पी-फ्लो जगातील पहिला पोर्टेबल तसेच डिस्पोजेबल कीट आहे. यामुळे रुग्ण त्याच्या घरी वरील सर्व तपासण्या करू शकतो. तपासणी नंतर रिपोर्ट त्याच्या मोबाईलवर येते म्हणजे त्याला कुठेच जायची गरज नाही. पी-फ्लोद्वारे तीन वेळेच्या तपासणीसाठी केवळ नऊशे ते हजार रुपये लागतात. तसेच तपासणीची अ‍ॅक्युरेसी ही 95% असल्याने ही त्याची जमेची बाजू मानली जात आहे.

डॉ. आशिष तुम्ही महापुरुष आहात
डॉ. आशिष पाटील यांचे शिक्षण, त्यांची बाम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेट कंपनी तेजनक्ष हेल्थकेअर लिमिटेड तसेच त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांनी मिळविलेले पेटेंट, त्यांनी केलेले आविष्कार, सिंगापूर येथे फेलोशीपनंतर तेथील हॉस्पिटलने रोबोटीक सर्जन म्हणून दिलेली बड्या पगाराची ऑफर न स्वीकारता धुळ्यात हॉस्पिटल उघडणे हे सर्व शार्क अमन गुप्ता यांनी ऐकूण म्हणाले डॉ. आशिष तुम्ही महापुरुष आहात. त्यावर डॉ. पाटील म्हणाले ही माहिती अर्धीच आहे, पुढे मोठी लिस्ट आहे. हे एकूण उपस्थित सर्वच शार्कमध्ये हशा पिकला.

तुमच्याकडे इतका पैसा आहे?
शार्क अमित जैन यांनी तेजनक्ष कंपनीची व्हॅल्यू किती असल्याचे सांगितले त्यावर डॉ.पाटील यांनी सव्वाशे कोटी रुपये असल्याचे सांगितले. हे एकूण सर्वच शार्कनी भुवया उंचावल्या. त्यावर शार्क अमित बंसल म्हणाले, तुमच्याकडे इतका पैसा आहे मग तुम्ही शॉर्क टँककडून काय अपेक्षा करता. त्यावर पाटील म्हणाले आम्ही डॉक्टर, संशोधक, प्रशासकीय जबाबदारी सांभाळू शकतो विक्री बाबतच्या सहकार्यासाठी आम्हाला शार्कची मदत हवीय. याउत्तरवर सर्वच शार्कनी माना हलविल्या.

काय आहे शार्क टँक इंडिया
शार्क टँक इंडिया हे सोनी टीव्हीवरील कार्यक्रम असून नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करणार्‍या उद्योजकांसाठीचे व्यासपीठ आहे. या कार्यक्रमातील शार्कला जर एखाद्या उद्योगातील नवसंकल्पना आवडली तर ते त्यात गुंतवणूक करतात. शार्क टँक इंडिया – सीझन 1 संपूर्ण भारतातून 62,000 जणांनी भाग घेतला होता, त्यातून 198 व्यवसाय आपल्या विचारांना शार्कपर्यंत पोहोचवता आले. त्यापैकी 67 व्यवसाय गुंतवणूक मिळाली होती हे विशेष.

काय आहे पी-फ्लो? पी-फ्लो युरिन फ्लो मीटर असून त्याद्वारे लघवीची धार, इन्फेक्शन तसेच प्रास्टेट तपासणी केली जाते. या तपासणींसाठी आजही रुग्णालयात जावे लागते. मात्र पी-फ्लो उपकरणामुळे आता रुग्णाला हॉस्पिटलमध्ये येण्याची गरज भासत नाही. तो आहे त्या ठिकाणीच लघवीच्या विविध तपासण्या स्वतः करू शकतो व त्याचे रिपोर्ट त्याला लगेच मोबाईलवर मिळतात. या उपकरणामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांची मोठी बचत होत आहे. त्यामुळे अल्पावधीत हे उपकरण लोकप्रियता गाठत आहे.

रुग्णांचा वेळ, श्रम आणि पैसा वाचावा हे प्रामाणिक ध्येय डोळ्यासमोर आजवरची कामगिरी राहिली आहे. शार्क टँकमध्येही हेच ध्येय घेऊन गेलो त्यामुळे यश मिळाले. डॉ. आशिष पाटील व डॉ. प्रीती पाटील को-फाउंडर पी-प्लो

S.S Bapat Award – 2017

No Images.
Please upload images in images manager section. Click on Manage Images button on the right side of the gallery settings.
Please make sure that you didn't enabled option: Images of the Current Gallery. Option should have Show value to show images.

Asia & India Book of Record

Big Stone

AP Sir Birthday

BIS

RLPPS

Happy Stent

Webinar

Ventilator

USI-WZ

Sneezing

Corrona Yoddha

Contact